Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

श्री फकिरजी महाराज चरित्र थोडक्यात

श्री फकिरजी महाराज प्रगट

image21

पंढरीचा आला देव। घेऊन आपुले  वैभव। उल्हासले या गावचे सर्व। म्हणती हे भले केले।।४४।।

(अध्याय सतरावा, श्री फकिरजी चरित्रामृत) 


गुरांचे कळप सैरावैर होऊ लागले. संपुर्ण आकाश काळ्याक्षार ढगांनी पिंजुन गेले होते. त्यातच गारांच्या वर्षावाने रुद्र रूप धारण केले. घाबरलेली गुरे  गुराख्यानां कुठल्याही पद्दतीने जुमानत नव्हती. गुरे पिकात घुसून नासाडी करत होती. म्हणुन सर्वच गुराखी भांबावुन गेली. सर्व जीवांची ताटातुट होणार हे नक्की होते. पण तेवढ्यातच एका दिव्य युवकाने गुरांना मार्गस्थ केले. तितक्यात वादळ ही  शमले. समोर ओढवलेले संकट मिटले. हि असामान्य शक्ती असावी अशी गुराख्यांच्या मनाला ग्वाही पटली. घटनेची वार्ता गावात पसरली. काही दिवसांपुर्वीच एक युवक गौळण शिवारात आढळला होता. त्याला गुराख्यांनी कुणीतरी वेडा पिसा समजला होता. त्याच विभूतीला महादजी फोपसेंच्या नेतृत्वात गावात आनण्याचे ठरले. पण या दिव्य योगीला कुणाच्या घरी ठेवावे यासाठी धनजच्या गढी खाली सभा सुरु झाली. योगी सभेतुन उठुन जवळच्या एका घरात गेले व तेथेच राहण्याचा हठ्ठ करू लागले. ते घर होते सिकंदर नावाच्या फकिराचे. हा योगी फकिराच्या घरी राहू लागला. म्हणुन लोकं त्यांना फकिर नावाने हाक मारू लागली.

गावोगावात अंधश्रद्धा, महामारी, नापिकी, मराठा-मुघल संघर्ष यामुळे गोरगरिबांचे हाल अमानवीयच होते.  श्री फकिरजी महाराज प्रगटले ते मानवतेचा  संदेश देण्यासाठीच. श्री फकिरजी महाराज यांच्या कालखंडाचा लेखी पुरावा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा प्रगट दिन अथवा संबंधित इतर तारखा सांगता येऊ शकत नाही.

दिव्य अस्तित्व

image22

पाहिले  फकिरजीचे विचार प्रवाह। वाहू लागले निसंदेह। अधिकाराविण न कळे गुह्य।

दया सारी संतांची।।६४।।

(अध्याय पंधरावा, श्री फकिरजी चरित्रामृत)  


पुढे फकिर गुराख्याचे कामे करू लागला. इतर गुराख्या प्रमाणेच त्यांची दिनचर्या सुरु होती. फकिरजी साठी लोक सिकंदराच्या घरी जेवण आणुन देत. जे हि मिळत फकिरजी ते सेवन करत. एकेदिवशी सिकंदराच्या पत्नीने शिदोरीत मांसाचे जेवण पाठवले. सर्व गुराखी नेहमीप्रमाणे वयान नदीवरील महादेवाच्या पिंडी जवळ गोळा झाले. गुराख्यांनी फकिरजीला मांस भक्षण करण्याचा आग्रह केला तोच त्या मांसाची फुले झाली. व या घटनेची वार्ता पंचक्रोशीत पसरली फकिराला देवाचाच अवतार समजू लागली. 

फकिरचा फकिरजी महाराज झाला, आजुबाजूला भक्तांची मांदियाळी वाढली पण मात्र फकिरजी महाराजांनी पूर्वीची दिनचर्या सोडली नाही.

फकिरजी कधी गाई चारायला जात. कुठलेही संकट आले कि भक्त फकिरजीचा  धावा करीत. फकिरजी घोड्यावर टाच मारून गावात कुठेही उपस्थित होत. फकिरजी कडे प्रत्येक संकटाचे निवारन असायचे.  


त्यानंतर फकिरजी महाराजांनी गुरांवर आलेल्या रोगाचे निराकरण केले, एकमेकांच्या जीवावर उठलेल्या रेड्यांना शांत करून झुंज सोडवली, पुरामुळे अडकलेले भयभीत लोक व वाघिणीला बछड्यांसोबत वाचवले, अतिवृष्टी पूर यामुळे नापिकी त्यासाठी नदीत बांध घातला, गावात होणाऱ्या दरोड्याचे संकट टाळले, संगमावररील पिंडीजवळ सर्पापासून लोकांचा बचाव केला, दडपलेले प्राचीन हनुमान मंदिर शोधले, सर्पदंशी-साथ-महामारी रोग्यांची चिकित्सा केली. अशा अनेक अलौकिक कर्मांचे प्रमाण आजही लोक पिढ्यानपिढ्या देतात. या सर्वांचे वर्णन त्यांच्या चरित्र ग्रंथात आढळते. 


आजही भक्तांच्या मनातील उर्जा, प्रेम, वृत्ती यामुळे फकिरजींचे दिव्य अस्तित्व येथे जाणवते. 

समाधी

image23

झुरती जण होऊन लुब्ध। फकिरजी झाले अंतरी स्तब्ध।  सुटला देहखोलीचा संबंध। 

ब्राम्हनंदी लिन झाली।।१०२।।

(अध्याय पंधरावा, श्री फकिरजी चरित्रामृत)  


त्या रात्री फकिरजी भक्तांना आत्मबोध सांगत बसले होते. त्यांच्या सभोवतालची मंडळी महाराजांच्या मुखातून पडलेले शब्द एकाग्रचित्ताने ऐकत होते. रात्रीचा काळोख अचानक वाढत चालला होता. वारा काल कपटाच्या घिरट्या घालत होता. रात्री भुंकणारी कुत्रे हि स्तब्द झाली. वातावरणात कमालीचा विद्रोह जाणवू लागला होता. तितक्यातच फकिरजीच्या हृदयात एकच धडक भरली. महाराजांचे चित्त निजानंदात लोळत होते. देहाच्या खोलीत खेळत होते. बसलेल्या लोकांची मन दुःखात बुडणार होती. महादजी आदी भक्तांना बोलवण्यात आले. सर्व भक्तांनी महाराजांना वाचवण्यासाठी प्रयन्त चालवला. हरिनामाचा पाठ सुरु झाला. फकिरजीची चेतना जागृत झाली. महाराज लोकांना उपदेश करू लागले. फकिरजीचे हृदय पुन्हा दाटून आले. श्वास मंदावला श्री ब्राम्हनंदी लिन झाले तोच भक्तांचा आकांत चालला.


महाराज ब्राम्हनंदी लीन झाल्यावर त्यांचे समाधी मंदिर वयाण नदीच्या काढावर बांधण्यात आले. येथेच महाराजांची अलौकिक  काया आजही समाधिस्थ आहे. 


त्यानंतर महाराजांची लौकिकता वाढतच गेली. आजुबाजूच्या परिसरातून लोक दर गुरुवारी समाधी दर्शनासाठी येऊ लागली. दर कार्तिक व आषाढी मासात वद्य प्रदिपतेला लोक येथे वारीसाठी (यात्रेसाठी) दाखल होतात. दरवर्षी भाविकांसाठी भागवत सप्ताह व किर्तन महोत्सव यांचे आयोजन करण्यात येते. यात्रेच्या दिवशी दुपारी काल्याचे किर्तन होते. राधा-कृष्ण यांचा भव्य रथ मिरवणुक निघते. श्री फकिरजी महाराज पालखी सोहळा निघतो. दहीहांडी काल्याने यात्रेची सांगता होते. या वारीचे वैशिट्य म्हणजे कन्या-भाकरी चा महाप्रसाद घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातु येथे दाखल होतात.

टिप- संकेतस्थाळावरील श्री फकिरजी महाराजांचे छायाचित्र वास्तवीक नसून ते 'श्री फकिरजी चिरत्रामृत' या ग्रंथातील आहे. श्री फकिरजी महाराजांचे वास्तवीक छायाचित्र उपलब्ध नाही.