Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

श्री फकिरजी महाराज संस्थान, धनज माणिकवाडा तिर्थक्षेत्र परिसरात तुमचे सहर्ष स्वागत!

संकेतस्थळावरील सांगितलेले अंतर हे श्री फकिरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथुन दर्शविले आहे. 

इतर ठिकाणी भेट | Places To visit

फत्तेपुर टेकडी, धनज माणिकवाडा

image13

हे प्राचीन ठिकाण गाई-गुराखी सर्व गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. धनजच्या पश्चिमेलाआहे. याठिकाणी फत्तेपुर बाबा गुराढोरांची चिकित्सा करत. 

हनुमान मंदिर, धनज माणिकवाडा

image14

 याच प्राचीन शिल्पकला असलेल्या मंदिराचा शोध श्री फकिरजी महाराजांनी लावला. त्यापूर्वी  या ठिकाणाला टेकडी चे स्वरूप होते. तेव्हापासूनच त्यांच्या दिव्यतेची प्रचीती सर्वसामान्यांत वाढली.

वयाण शिवलिंग, धनज माणिकवाडा

image15

श्री फकिरजी महाराज जेथे गाई चारायला जात, शिदोरी मधुन जेवण करत, विश्रांती करत. तेथे महादेवाची प्राचीन पिंड होती ती आजही  अस्तित्वात आहे .  

श्री नामदेव महाराज मंदिर, माणिकवाडा

image16

नामदेव महाराजांचा मठ १ कि.मी. अंतरावर आहे.

पंचबोल केंद्र, पाथ्रड धरण, पाथ्रड

image17

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. धनज-माणिकवाडा क्षेत्राला पाणी पुरवठा येथुनच होतो. येथील पंचबोल केंद्र प्रसिद्ध आहे.


मंगला माता मंदिर, मांगलादेवी

image18

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर आहे. प्राचीन मंदिर असून येथिल नवरात्र उत्सव  प्रसिद्ध आहे. 

श्री मोहन महाराज तपोभूमी, दाभा

image19

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. दाभा हे गाव मोहन महाराज यांच्या कार्या मुळे तपोभुमी म्हणुन ओळखले जाते.  

रेणुका माता मंदिर, रेणुकापूर, नेर

image20

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर आहे. प्राचीन मंदिर असून येथिल  नवरात्र उत्सव  प्रसिद्ध आहे.  

श्री उद्धव बाबा मंदिर, माणकी आंबा

image21

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे. माणकी या गावी उद्धव बाबांचे भव्य मंदिर आहे.

श्री मुंगसाजी महाराज मंदिर, धामणगाव

image22

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ४८ कि.मी. अंतरावर आहे. दरबारात स्वयंप्रेरणेने मानवी आकृतीचे स्वरुपात अंदाजे १ फुट इतकी वर आलेली आहे. मुंगसाजी देवाचे अस्थी ठेवलेले समाधी मंदिर (भुयार) हा सुद्धा दरबारचाच एक भाग आहे. 

बेंबळा धरण, बाभूळगाव

image23

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे २९ कि.मी. अंतरावर आहे. बेंबळा धरण हे जिल्ह्यातल्या बेंबळा नदीवर असलेले धरण आहे. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत. 

चिंतामणी देवस्थान, कळंब

image24

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर आहे. विदर्भातील अष्टचिंतामणी पैकी एक. वैशिष्ट्य दक्षिणमुखी सुंठ असलेली गणपतीचे रूप. मंदिराचा अनेक पौराणीक ग्रंथात उल्लेख आढळतो.   

पोहरादेवी देवस्थान, पोहरादेवी

image25

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ७७ कि.मी. अंतरावर आहे.  वाशीम जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 

टिपेश्वर अभयारण्य, पांढरकवडा

image26

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे ११९ कि.मी. अंतरावर, यवतमाळहून ९२ कि. मी. अंतरावर आहे. या जंगलात असलेल्या टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले आहे.  

सहस्रकुंड धबधबा, उमरखेड

image27

धनज-माणिकवाडा गावापासून सुमारे १९१ कि.मी. अंतरावर, यवतमाळ वरून १६१ कि. मी. अंतरावर आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटक केंद्र आहे.