Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

 आषाढी व कार्तिकमासी। दरसाली वद्य प्रतिपदेशी। काल्याचे प्रसंग सगळ्यांशी। वाटती फार महत्वाचे ।।१५।।

(अध्याय अठरावा, श्री फकिरजी चरित्रामृत) 


श्री फकिरजी महाराज कार्तिक यात्रा ही विदर्भातील वैशिट्यपूर्ण  यात्रा म्हणून ओळखली जाते. पंढपुर प्रमाणेच कार्तिक मासात सर्व भक्त फकिरजी चे दर्शन घ्यायला येथे दाखल होतात. भक्त व महाराजांच्या भेटीचा सोहळा भव्य असतो. कार्तिक वद्य प्रतिपदेला ही यात्रा भरते म्हणून यास कार्तिक यात्रा म्हटल्या जाते. कार्तिक यात्रेच्या दरम्यान संस्थान दरवर्षी भाविकांसाठी भागवत सप्ताह व किर्तन महोत्सव यांचे आयोजन करते. यात्रेच्या दिवशी दुपारी काल्याचे किर्तन होते. वारकरी परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात पुरुष वारकरी मंडळ, महिला वारकरी मंडळ, बाल वारकरी मंडळ,  गुरुदेव सेवा भजन मंडळ, अवधुती भजन मंडळ, टिपरी-लेझीम पथक, बँड पथक सहभागी होतात . राधा-कृष्ण यांचा भव्य रथ मिरवणुक निघते. यात श्री फकिरजी महाराज यांच्या पालखी चे विशेष आकर्षण असते. "जय फकिरजी" आणि "जय फकिरजी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. दहीहांडी काल्याने  यात्रेची सांगता होते. 

या यात्रेचे वैशिट्य म्हणजे कन्या-भाकरी चा महाप्रसाद घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातु येथे दाखल होतात.