Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

मंदिरा विषयी | THE TEMPLE

श्री फकिरजी महाराज समाधी मंदिर

फकिरजीच देतील बुद्धी। त्यांच्या दरबारी नांदती सिद्धी। तेच चरित्राची करतील सिद्धी। आपण सोडा चिंता ही।।२१।। (अध्याय पहिला, श्री फकिरजी चरित्रामृत) 


वयाण नदीच्या काठावर श्री फकिरजी महाराजांचे भव्य दिव्य समाधी मंदिर आहे. महाराज ब्राम्हनंदी लीन झाल्यावर त्यांचे समाधी मंदिर या ठिकाणी बांधण्यात आले. येथेच महाराजांची अलौकिक  काया समाधिस्थ आहे. याच ठिकाणी हिंदु-मुस्लिम धर्मिय भक्त आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायला येतात. समाधी स्थळाला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा मार्गात विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज मुर्ती स्थळ व इतर देवीदेवतांची छोटी-मोठी मंदिर आहे. नजिकच्या काळात समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 

श्री फकिरजी मंदिर परिसर व इतर दर्शनीय स्थळे

श्री फकिरजी महाराज समाधी मंदिरा समोर भव्य अशे सभामंडप आहे. पुर्वीचा नगारखाना आता नसुन याची जागा आता आधुनिक स्वयंचलित नगाऱ्याने घेतली आहे. सभामंडपात भक्तगण प्रार्थना करतात. येथेच देणगी कक्ष सुद्धा आहे. 

 • विठ्ठल रुक्मिणी मंदिर
 • संत तुकाराम महाराज मुर्ती स्थळ
 • संत विक्रम महाराज समाधी स्थळ
 • ध्वज 
 • हनुमान मंदिर  
 • दहा समाधी देऊळ
 • पंचशिवलिंग हनुमान मंदिर

श्री फकिरजी मंदिर परिसरातील सभागृह व इमारती

 1. संस्थान कार्यालय इमारत 
 2. शुभम मंगल कार्यालय  
 3. भक्त निवास 
 4. स्वयंपाक गृह
 5. भोजन कक्ष