Shree Fakirji Maharaj Sansthan

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८संकेतस्थळ प्रकाशन- कार्तिक वद्य प्रतिपदा २४/११/२०१८

दर दोन वर्षातून एकदा साथ उत्सव हा साजरा केल्या जातो. या दरम्यान गावातील देवी-देवतांचे पुजन केल्या जाते. या सोबतच लोक सहभागातुन गावात स्वच्छता केली जाते. बांबु-बासांचे सजवलेले  द्वार तयार करून चौक चौकात उभारले जाते. हा उत्सव सात दिवस चालतो. दररोज गावातुन श्री फकीरजी महाराज पालखी दिंडी निघते. या दिंडीत पुरुष वारकरी, महिला वारकरी, बाल वारकरी, गुरुदेव सेवा भजन मंडळ, अवधुती भजनकार पथक, टिपरी-लेझीम पथक, बँड पथक सहभागी होतात. "जय फकिरजी" हा नामघोष सर्वत्र घुमतो. मुस्लिम धर्मिय भक्त यात मोठ्या उत्साहाने भाग घेतात. संदल काढतात व फकिरजीच्या नावाने मिरवणुकीत घोडा नाचवतात. फकिरजीच्या समाधीवर गलब चढवतात. शेवटच्या दिवशी सर्व धर्मीय लोक फकिरजी महाराजांना पुरण पोळीचा नैवॆद्य दाखवतात. व अशाप्रकारे या साथ उत्सवाची सांगता होते.  

प्राचीन काळात महामारीची साथ पसरायची. तेव्हा फकिरजी कडे भक्त साकड घालत.


हा साथ उत्सव हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे अशाप्रकारचे एकमेव ठिकाण आहे. 

या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी आकाराचे कागदाचे फुगे आकाशात उडवण्याची प्रथा. व हे दृश्य टिपण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन लोक येथे दाखल होतात. अशा प्रकारची प्रथा आज जगात कुठेही आढळत नाही.